लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोथरूड भागात गज्या मारणे टोळीतील गुंडांनी एका संगणक अभियंता तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर शुक्रवारी मध्यरात्री पौड रस्त्यावरील जय भवानीनगर परिसरात सराइत आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर लावलेल्या दुचाकी ढकलून दिल्या .या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली.

पौड रस्त्यावरील जय भवानीनगर परिसरात चाळ क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास टोळक्याने रस्त्यावर लावलेल्या चार ते पाच दुचाकींना लाथा मारल्या. शिवीगाळ करुन दहशत माजविली, असा आरोप या भागातील रहिवाशांनी केला. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जय भवानीनगर परिसरात सराइतासह साथीदाराने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर या भागातील रहिवाशांनी किष्किंदानगर पोलीस चौकीत धाव घेतली. स्थानिक महिलांनी पोलीस चौकी परिसरात गर्दी झाली होती. सराइतासह साथीदारांविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली.

जय भवानीनगर परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराइताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात वाहनांची तोडफोड झाली नाही, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.

कोथरुडच्या गुन्हेगारीवर संताप

कोथरुड भागात संगणक अभियंता तरुणाला गुंड गज्या मारणे टोळीतील सराइतांनी मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ’पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात गुंडांच्या चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित होतात. पोलिसांना हे दिसत नाही का? पोलीस डोळे बंद करुन बसलेत का,’, असा प्रश्न उपस्थित मोहोळ यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, तसेच पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षणही करावे, असे मोहोळ यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर कोथरुड भागातील जय भवानीनगर परिसरात दहशत माजविण्याची घटना घडल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट उडाली.

सातवाहनकालीन नागवंशीय, पैठणमधील एकनाथांना बहिष्कृत करण्याचा प्रसंग आणि ब्राह्मण याचे दाखले देत राणा यांनी विद्रोही साहित्यात ‘गंगा – जमुना तहजीब’ जिवंत ठेवण्यासाठी सावध राहावे, अशी भूमिका मांडली.

या वेळी माजी अध्यक्ष वासुदेव मुलाटे, विद्रोही साहित्य चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रतिमा परदेशी यांचेही भाषण झाले. शाहीर गणेश शिंदे यांनी साहित्य संमेलनाचे गीत म्हटले. व्यासपीठावर उर्दू साहित्यिक नुरुल हसनैन, प्रल्हाद लुलेकर, प्रतिभा अहिरे यांची उपस्थिती होती. साहित्यनगरीमध्ये विविध पुस्तकांची दालनेही उभारण्यात आली होती.

Story img Loader