पुणे : नामांकित संशोधन संस्थेतील प्रसाधनगृहात युवतीचे मोबाइलद्वारे चित्रीकरणाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका युवतीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती एका संशोधन संस्थेत संशोधन करत आहे. दोन दिवसांपूर्वी तक्रारदार युवती प्रसाधनगृहात गेली होती. त्या वेळी शेजारी असलेल्या षुरुषांच्या प्रसाधनगृहातून युवतीचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यात येत असल्याचे युवतीच्या लक्षात आले. युवतीने आरडाओरडा केल्यानंतर चित्रीकरण करणारा पसार झाला. पोलिसांनी संस्थेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.