पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे धर्मांतराबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीनही महिलांना नोटीस बजावत समज दिली आहे. बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असे म्हणून ३९ वर्षीय तक्रारदार यांना विश्वासात घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय तक्रारदार यांच्या घरी तीन महिला वारंवार येऊन तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असे म्हणून बायबल वाचून दाखवत होत्या. याबाबत अनेकदा तक्रारदार महिलेने आम्हाला हे काही समजत नाही. आम्हाला या गोष्टीमध्ये पडायचं नाही असं समजावून सांगितलं होत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तीनही महिला तक्रारदार यांच्या घरी बळजबरीने शिरल्या, त्यांनी तक्रारदार यांना पुन्हा अशाच प्रकारची बळजबरी करत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सांगत मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – पुणे : विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांमध्ये घट

हे सर्व सुरू असताना तक्रारदार यांनी संबंधित तीनही महिलांना बाहेर जाण्यास सांगितलं. परंतु, त्या बाहेर जात नव्हत्या, अखेर त्यांच्या पुतण्याला बोलवून घेऊन महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या जात नसल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. संबंधित महिलांबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही महिलांना वाकड पोलिसांनी नोटीस बजावत समज दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempted conversion to christianity by three women at rahatani kjp 91 ssb