ऑम्लेट व्यवस्थित बनविले नाही, या कारणावरून पोलीस हवालदाराने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मध्यस्थी करणाऱ्या मुलाला हवालदाराने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलीस हवालदारास अटक केली.या प्रकरणी पोलीस हवालदार मनीष मदनसिंग गौड (वय ५०, रा. दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे. गौड पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. ते आंबेगावमधील दत्तविहार सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी गौड यांच्या पत्नीने ऑम्लेट केले.

हेही वाचा >>>पुणे: गुजरात बर्फीचा पाच लाख ९० हजारांचा साठा जप्त; अन्न आणि ओैषध प्रशासनाची कारवाई

ऑम्लेट न केल्याने गौडने पत्नीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर गौड यांनी स्वयंपाकघरातील सांडशी पत्नीच्या डोक्यात मारली. पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला.त्या वेळी गौड यांचा मुलगा घरात होता. मुलाने मध्यस्थी केली. तेव्हा त्याला गौड यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

Story img Loader