अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. मुलीने प्रसंगावधान राखून आरोपीस प्रतिकार केला. मुलीच्या प्रतिकारामुळे आरोपी पसार झाला. याबाबत मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

पीडित बारा वर्षांची मुलगी वानवडी भागातील चिमटा वस्ती परिसरातील नाल्याजवळून निघाली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला अडवले. ‘तुला मावशीने बाेलाविले आहे’ अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर त्याने मुलीला नाल्याजवळ असलेल्या झाडीत ओढून नेले. मुलीने प्रसंगावधान राखून आरोपीला प्रतिकार केला. मुलीने आरोपीला लाथ मारली आणि त्याच्या तावडीतून सुटका केली. मुलीने प्रतिकार केल्यानंतर आरोपी पसार झाला.

हेही वाचा- ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा’; पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

घाबरलेल्या मुलीने आईला याबाबतची माहिती दिली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून मुलीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

Story img Loader