लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मार्केट यार्ड भागात एका बँकेतील सुरक्षारक्षकाला चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.विजय महादेव गायकवाड (वय ५५, रा. शिवदर्शन) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अल्पवयीनाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा-पिंपरी : ताबा घेण्याच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड मार्केट यार्डातील दी कराड अर्बन बँकेत सुरक्षारक्षक आहेत. गुरुवारी मध्यरात्री बँकेच्या आवारात अल्पवयीन शिरला. त्याने गायकवाड यांना चाकूचा धाक दाखविला. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. सुरक्षारक्षकाने प्रतिकार केल्यानंतर अल्पवयीन पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.