पिंपरी : तरुणाने पत्नी व सासू-सासर्‍यांना मारण्यासाठी पिस्तुल लोड केले. परंतु, गावठी पिस्तुल असल्याने ट्रिगर दाबला गेला नाही आणि तिघांनी पिस्तुल हिसकावून घेतले. त्यामुळे पत्नीसह तिघांचे प्राण वाचले.  ही घटना रविवारी ( २९ डिसेंबर) सायंकाळी साडेचारच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी याबाबत माहिती दिली. पत्नीने मोशी येथे सासरी यावे यासाठी पती निघोजे येथे आला होता. त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या हातातील मोबाइल त्याने हिसकावून घेतला. ‘तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालेल’, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर त्याने सासर्‍याला उद्देशून मला तुमच्याशी दहा मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणत कमरेला खोचलेली पिस्तुल बाहेर काढून लोड केली. तुमच्या तिघांना मी ठेवत नाही, असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तुल रोखले.

हेही वाचा >>>नव्या टपाल कार्यालयाचे उद्घाटन; बावधन आता पुणे ४११०७१

 त्याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावठी पिस्तुल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही. ही घटना लक्षात येताच पत्नीने पतीवर झडप घालून त्याच्या हातातील पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई-वडिलही आले. तिघांनी मिळून त्याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेतले. त्यानंतर पती तेथून निघून गेला. तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी दोन-तीन महिने तुरुंगात जाईल. मात्र, सुटून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने सासर्‍याला दूरध्वनी करून दिली.