लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात घातक लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेझर दिव्यांचा वापर न करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना वेळोवेळी आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांकडून यंदाही ध्वनीवर्धक यंत्रणा आणि घात लेझर दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. घातक लेझर दिवे आणि ध्वनीवर्धकांच्या दणदणाटावर पोलीसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईकडे सामान्याचे लक्ष लागले आहे

Mumbai-Bengaluru journey now faster 14-lane highway to be made
मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (१७ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.

आणखी वाचा-पुणे: मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित

विसर्जन मार्गावर भाविकांसाठी मदत केंद्र

विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

मध्यभागातील १७ रस्ते बंद

शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आणखी वाचा-कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर महाग

विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री बारापर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.ध्वनीप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. -जी. श्रीधर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा