लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या शिल्लक २२ गाळे आणि ४ रो-हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या २४ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक तीसमधील कनव्हिन्सिंग शॉपिंग सेंटरमधील पाच व्यापारी दुकाने असून त्यांची किंमत १२ लाख ६५ हजार २९२ ते १९ लाख ८१ हजार ६७१ एवढी आहे. पेठ क्रमांक १२ मधील गृहयोजना क्रमांक एक आणि दोन मधील उर्वरीत १६ व्यापारी दुकाने असून त्यांची किंमती ९ लाख ४८ हजार १२३ ते २० लाख ७७ हजार ३७ एशी आहे. पेठ क्रमांक चारमधील दुकान क्रमांक सहा मधील एक दुकान असून त्याची किंमत ४३ लाख ८२ हजार ३५१ एवढी आहे. ही दुकाने अनुसुचीत जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

तसेच पेठ क्रमांक सहा मध्ये चार रो-हाऊस असून क्रमांक ए-पाच याची किंमत १ कोटी २४ लाख ९६ हजार ५९६, रो-हाऊस क्रमांक बी-६ ची किंमत १ कोटी २४ लाख ७३ हजार ४८८, रो-हाऊस क्रमांक ए-८ ची किंमत १ कोटी २४ लाख ७९ हजार ९३७ आणि रो-हाऊस क्रमांक बी-८ ची किंमत १ कोटी २४ लाख ७३ हजार ४८८ एवढी आहे. अशा एकूण २२ गाळे आणि चार रो-हाऊसचा ई-लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. ऑनलाईन अर्ज https://eauction.gov.in या संकेतस्थळावरून करता येणार आहे.