पिंपरी- चिंचवड मध्ये वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली होती.यापैकी पार्क स्ट्रीट येथील सहाव्या मजल्यावर असलेल्या चार बी.एच.के फ्लॅट ची एक लाख ५५ हजाराची थकबाकी असल्याचे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने सांगितले होते. याबाबत फ्लॅटवर नोटीस लावण्यात आली होती. अखेर या फ्लॅटची थकबाकी ऑनलाइन स्वरूपात अदा करण्यात आली आहे. तर वाकड येथील फ्लॅटची २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा केले आहेत.

वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पिंपरी- चिंचवड मध्ये वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची बाब उघडकीस आली. काळेवाडी येथील पार्क स्ट्रीट सोसायटीत सहाव्या मजल्यावर वाल्मिक कराडच्या नावावर आलिशान चार बी.एच.के फ्लॅट असल्याचे उघड झालं. परंतु, दीड लाखांची थकबाकी असल्याची नोटीस पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून लावण्यात आली होती. वाकड परिसरातील ‘मी कासा बेला’ या सोसायटीत टू बी.एच.के फ्लॅट वाल्मिक कराडची पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. त्या फ्लॅटवर देखील चालू वर्षांचा थकीत कर बाकी होता. हे दोन्ही कर कराड कुटुंबीयांनी ऑनलाइन पद्धतीने भरले आहेत. पार्क स्ट्रीट येथील दीड लाखांचा थकीत कर भरल्याने जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया टळली आहे.

kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
youth from Yewati village in Lonar taluka died during treatment in Palghar Buldhana news
बुलढाणा: सासुरवाडीला गेला अन अनर्थ झाला! केवळ मोबाईलसाठी…
nagpur encroachment on garden lands
विकासाच्या नावाखाली अतिक्रमण, नागपुरातील काही उद्याने बंद, जागेवर व्यावसायिकांचा डोळा ?
Story img Loader