पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण झालं आहे –

पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती सांगत कुठे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसंच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
ap dhillon diljit dosanjh dispute
दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

यावर महिला अधिकारी बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का पीआयला असं विचारतात. यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. “त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?,” अशी विचारणा महिला अधिकारी करते.

“आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो,” असं पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे? असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असं सांगतो.

“तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते,” असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम. मी सांगतो असं उत्तर देतो.

ऑडिओ क्लिपच्या शेवटी महिला अधिकारी म्हणतात की, “त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही”.

गृहमंत्र्यांनी घेतली दखल

“या प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असं दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

Story img Loader