पुणे : लोकसभा निवडणुकीत घटना बदलण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना लेखक अभ्यासक प्रा. आनंद रंगनाथन यांनी घटना बदलण्याचे समर्थन केले. ‘घटना बदलांबाबत भीती निर्माण केली जात असली, तरी घटनेत बदल आवश्यक आहेत. कारण भारत लोकशाही राष्ट्र झाल्यापासून लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे घटना बदलली पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकसित भारततर्फे आयोजित मोदी विरुद्ध इतर : द केस फॉर विकसित भारत कार्यक्रमासाठी प्रा. रंगनाथन पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रा. रंगनाथन यांनी घटनेतील बदल, आयुष्यान भारत, देशातील विकास, देशाची अर्थव्यवस्था, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

हेही वाचा >>>कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील

प्रा. रंगनाथन म्हणाले, की घटनेतील  सुधारणा, अनुच्छेदांमुळे अराजक निर्माण होते. अभिव्यक्त स्वातंत्र्यावर निर्बंध आणले जातात. त्यामुळे लोकशाहीविरोधी पावले टाकली जाऊ शकतात. हे दूर करण्यासाठी घटना बदलणे आवश्यक आहे. घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही अटींसह आहे. मग हे कसले अभिव्यक्ती स्वातंत्र्य? मात्र पहिल्या सुधारणेतून जवाहरलाल नेहरू यांनी घटनेवर पहिला प्रहार केला. देशात हुकुमशाही असल्याबाबत बोलले जाते. मात्र आजही देशात मोदी हुकुशहा आहेत की नाही या बद्दल मोकळेपणाने चर्चा करता येते. उत्तर कोरियात किम जो ऊन यांच्याबाबत अशी चर्चा करता येईल का? सत्तेच्या विरोधात बोलायचे म्हणून काही लोक बोलत असले, तरी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल स्टॅलिन, पिनरायी विजयन सत्तेत नाहीत का? संदेशखालीमध्ये काय चालले आहे? पोलिसांवर विश्वास नाही म्हणून शाहजान शेखला सीबीआयकडे सोपवा असे न्यायालयाला सांगावे लागले. जनता हे सारे पाहत आहे. मोदीद्वेषातून त्यांना हुकुमशहा करण्यात आले, मात्र ज्यांच्या जीवावर तुमचे दुकान सुरू आहे ते सगळे योग्य करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author scholar prof anand ranganathan said why change in constitution is necessary pune print news ccp 14 amy