पुणे : प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. विश्रांतवाडी भागात ही घटना घडली. याबाबत एका तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीने नवीन दुचाकी खरेदी केली होती. दुचाकी खरेदीनिमित्त मैत्रिणीने एका हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री पार्टी आयोजित केली होती. रात्री उशीरा तरुणी हाॅटेलमधून बाहेर पडली. घरी जाण्यासाठी तिने ॲपवरुन रिक्षाची नोंदणी केली. रिक्षाचालक रात्री साडेबाराच्या सुमारास तेथे आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बँक व्यवस्थापकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य; विरोध केल्याने महिला कर्मचाऱ्याची बदली करुन मानसिक त्रास

तरुणीला घेऊन तो तिला घरी सोडण्यासाठी निघाला. निर्जन रस्त्यावर त्याने तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तरुणीने पोलिसांना रिक्षा क्रमांक दिला. रिक्षा क्रमांकावरुन पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याला नोटीस बजाविण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ताराचंद सुडगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto rickshaw driver arrested for sexually harassing female passenger pune print news rbk 25 zws