लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या चार रिक्षा, एक लाख ७० हजार रुपये किंमतीची एक स्पोर्ट्स बाईक असा सात लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

pistol smuggler arrested with four others in Pimpri Chinchwad
कारागृहातून बाहेर पडताच वाहन चोरीचे गुन्हे; दोन मोटारी, पाच दुचाकी जप्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Fraud with retired bank officer withdrawing money from ATM
पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक
uran farmers land marathi news
‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; खासगी चालकाना पाचारण करण्याचा विचार
pune police register case against man for giveing false information to police under the influence of alcohol
दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध गुन्हा
girl molested in nandurbar
Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग; अश्लिल व्हिडीओ दाखवून…
deepak kesarkar
भूमिगत बाजारपेठेबाबत अधिकाऱ्यांची चालढकल

रिजवान रमजान मुलानी (रा. चिखली), आर्यन प्रमोद भालेराव, सुमित भिम सुर्यवशी (दोघे रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऑटो रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते. या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाचे दोन गट तयार करण्यात आले होते.

आणखी वाचा- पुणे: जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

तपास पथक भोसरीत पेट्रोलिंग करताना आरोपी आर्यन आणि सुमित संशयास्पदरित्या एका ऑटो रिक्षासह जाताना दिसले. पोलिसांनी रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी ऑटो रिक्षासह पळून जावू लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता साथीदार रिजवान याने साथीदारांसह रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रिजवान याला चोरीच्या ऑटो रिक्षासह अटक केले. चौकशीत तीनही आरोपींनी चार रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले.