लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये सरासरी ६० मतदान झाले आहे. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार का, किती टक्के मतदान होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १६ लाख ४ हजार ८८६ मतदार होते. त्यामध्ये फक्त ७ लाख १७ हजार ७१६ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ४४.७१ एवढी होती. त्यानंतर २०१४ ला झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण १९ लाख ५३ हजार ७४१ मतदार होते. त्यापैकी ११ लाख ७४ हजार ३८० मतदारांनी आपला हक्क बजाविला. ही टक्केवारी ६०.११ एवढी होती. २०१९ मध्ये एकूण मतदार २२ लाख ९८ हजार ८० इतके होते. यावेळी २०१४ च्या टक्केवारीचा विचार करता कमी मतदान झाले. एकूण मतदारांपैकी १३ लाख ६८ हजार ८७२ मतदारांनी बाहेर पडत मतदान केले. यावेळी ५९.५७ टक्के मतदान झाले.

आणखी वाचा-आरटीई प्रवेश प्रक्रिया आता पूर्वीच्याच पद्धतीने

मतदार जनजागृती जोरात

निवडणूक आयोग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, शनिवार, रविवार आणि आज सोमवारी मतदानाची सुट्टी अशा जोडून तीन सुट्या आल्या आहेत. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांतील मतदान

२००९ – ४४.७१ टक्के
२०१४ – ६०.११ टक्के
२०१९ – ५९.५७ टक्के

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Average voting in maval is only 60 percent how much will be the voting this year pune print news ggy 03 mrj