नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नी आणि सासूवर एकाने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना फुरसुंगी भागात घडली.या प्रकरणी चेतन जंगले याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली चेतन जंगले (वय २७,रा. फुरसुंगी) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. सोनालीने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चेतन आणि त्याची सोनाली यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील !; मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावना

वादामुळे सोनाली माहेरी निघून आली होती. त्यामुळे चेतन पत्नीवर चिडला होता. चेतन मध्यरात्री बाराच्या सुमारास पत्नीच्या माहेरी गेला. त्याने सोनालीला घरी चल, असे सांगितले. तिने नकार दिला. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने सोनालीवर वार केले. त्यानंतर भांडणात मध्यस्थी करणारी सासू संतोषी यांच्यावर चेतनने कुऱ्हाडीने वार केले. पसार झालेला आरोपी चेतनचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक डमरे तपास करत आहेत.