देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे यथोचित स्मारक आणि मजुर अड्ड्यावरील अतिक्रमण हटवून, त्या जागी मजूर भवन उभारण्यात यावे, या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या मजुर अड्डा येथे लाक्षणिक उपोषणास करण्यात येत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त सुरु केलेल्या या लाक्षणिक उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
हेही वाचा- पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन खरेदीकडे कल, मालमत्ता खरेदी-विक्रीतून पाच हजार कोटींचा महसूल
यावेळी बाबा आढाव म्हणाले की, देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करण्याच काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केल.या ऐतिहासिक भिडे वाड्याच राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे. या कामासाठी निधी देखील पाहिजे.पण इच्छा शक्ती दिसून येत नाही.त्यामुळे या मागणीसाठी 20 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषणास बसलो होतो.
हेही वाचा- दोन महिन्यांतील उन्हाच्या चटक्याचा, अतिवापराचा परिणाम; राज्याच्या जलसाठय़ात १२ टक्के घट
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे वाडा येथील स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल,अशी घोषणा हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे केली.त्यानंतर बैठका देखील झाल्या आहेत.पण जोवर कामांना गती मिळत नाही.तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहणार आहे.तसेच आता मजुर अड्डा देखील अनेक वर्षांपासून येथे आहे.त्या ठिकाणी मजुर भवन उभारले गेले पाहिजे.या ठिकाणी अतिक्रमण असून ती महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर हटविले पाहिजे.या दोन्ही मागण्यासाठी आज लाक्षणिक उपोषणाला बसलो असून राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.तर 30 जानेवारी पासून सत्याग्रह मार्गाने असाच लढा सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी राज्य सरकारला दिला.