लोणावळ्यानजिकच्या वरसोली गावातील ‘सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम’मध्ये रामदेव बाबा यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी रामदेव बाबा यांच्याच हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
संग्रहालयाचे प्रमुख सुनील कंडलूर, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख मिच्छद्र खराडे, सुभाष कंडलूर या वेळी उपस्थित होते. रामदेव बाबा म्हणाले, ‘देशात कलेचा सन्मान व्हायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्किल इंडिया’ विषयी बोलत आहेत. लोणावळ्यातील व्ॉक्स म्युझियम हे त्याच संकल्पनेचे उदाहरण आहे. या कलेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी महाराष्ट्रानंतर दिल्लीतही वॅक्स म्युझियम उभारण्यात यायला हवे.’
‘राजकारणात येण्याच्या अनेक संधी आल्या, मात्र मी राजकारणात न येण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. असे असले तरी निष्कलंक व चारित्र्यसंपन्न लोकांना राजकारणात आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे,’ असे प्रतिपादनही त्यांनी केले. ते म्हणाले, ‘देशात विवेकशील व विचारवंत लोकांच्या कमतरतेमुळे सर्वत्र वैचारिक व राजकीय असंतोषाचे वातावरण आहे. देशात धार्मिक असंतोष नाही.’
‘पतंजलीचा एक रुपयाही मी घेणार नाही!’
‘पतंजली संस्था ही शंभर टक्के ‘चॅरिटी’ आहे. संस्थेचा सर्व नफा सामाजिक कार्यासाठी असून एकही रुपया वा जागा मी घेणार नाही,’ असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
लोणावळ्यातील ‘वॅक्स म्युझियम’मध्ये बाबा रामदेव यांचा पुतळा!
लोणावळ्यानजिकच्या वरसोली गावातील ‘सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम’मध्ये रामदेव बाबा यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी रामदेव बाबा यांच्याच हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 16-01-2016 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev statue in lonavala wax museum