विविध भूमिकांमधील अमिताभ बच्चन यांना एकाच वेळी भेटायचंय? आता ते शक्य आहे, कारण अर्कचित्रकार सागर पवार यांनी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांनी काढलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अर्कचित्रांचे ‘बच्चन ७१’ हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांवर आधारित सुमारे ७१ अर्कचित्रे अमिताभ यांच्या चाहात्यांना पहायला मिळणार आहेत. त्यामध्ये ‘दिवार’मधील विजय, ‘डॉन’ मधील दोन्ही व्यक्तिरेखा, ‘अग्निपथ’मधील विजय दीनानाथ चौहान, ‘शहेनशहा’ तसेच ‘बॉम्बे टू गोवा’, ‘अभिमान’, ‘अमर अकबर अॅन्थनी’, ‘मुक्कदर का सिकंदर’ यांमधील व्यक्तिरेखांचा समावेश आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
‘बच्चन ७१’ उद्यापासून!
अमिताभ बच्चन यांच्या अर्कचित्रांचे ‘बच्चन ७१’ हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 18-12-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchan 71 exhibition from tomorrow