गुवाहाटीला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. दिव्यांग मंत्रालय करा तरच मी तुमच्यासोबत येणार अशी अट आमदार बच्चू कडू यांनी घातली होती, अशी माहिती बच्चू कडू यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये भर सभेत दिली आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग मंत्रालय होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्यांनी नाही केलं. ते सरकार बदललं. मलाही गुवाहाटीला जाण्याचं बोलावणं आलं. देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. मग गुवाहाटीच्या वाटेला लागलो. पण त्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की अगोदर दिव्यांग मंत्रालय करा तर मी तुमच्यासोबत येणार.
हेही वाचा – बिबट्याच्या कातडीची परदेशात विक्री; सीमाशुल्क विभागाकडून साताऱ्यातून एकाला अटक
गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो. ५० खोके ५० खोके असा आमचा उल्लेख केला. पण मला बदनामीची काही चिंता नाही. शिंदे यांनी जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय उभे केले. मी दिव्यांगांसाठी उभा राहिलो. सर्वजण मंत्रीपद मागत होते. आम्हाला मंत्रालय भेटले आहे. मंत्रीपदाचं काय देणंघेणं, असे कडू म्हणाले.