लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरात पावसाला सुरुवात होऊन तीन दिवस होत नाही तोच रस्त्यांची दुरवस्था पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्ते, उपरस्त्यांवर खड्डे पडले असल्याने रस्ते दुरुस्तीच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे आता खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ऐन पावसात धावाधाव सुरू झाली असून येत्या काही दिवसात रस्ते दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, रस्ते दुरवस्थेची गंभीर दखल आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनीही घेतली असून चार दिवसांत रस्ते दुरूस्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

महापालिकेच्या पथ विभागाकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही रस्ते खोदाई मे महिन्याअखेरपर्यंत सुरू होती. त्यामुळे रस्ते दुरुस्तीला यंदा पथ विभागाला पुरेसा वेळ मिळाला नाही. जून महिन्यात महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. रस्ते पूर्ववत करण्याची ही कामे ३१ मे पूर्वीच होणे अपेक्षित होते. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने जून महिन्यात रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांच्या पावसातच खड्ड्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. तशा तक्रारी महापालिकेकडे येण्यास सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा-पुणे: वेल्हे तालुक्यात दरड कोसळली; दापसरे-घोळ रस्ता वाहतुकीस बंद

रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीलाही त्याचा फटका बसत आहे. वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतली आहे. रस्ते दुरुस्तीची कामे अर्धवट का करण्यात आली, अशी विचारणा त्यांनी आढावा बैठकीत पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. आठ दिवसांच्या आत खड्डे बुजविले नाहीत तर कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्तीसाठी पथ विभागाची धावाधाव सुरू झाली आहे. ऐन पावसात रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जात असून रस्ते दुरुस्ती पावसात टिकणार का, हा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.