महापालिका प्रशासनाचा दावा; २०३० खड्डे बुजवल्याची माहिती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर बहुतांश खड्डे दिसून येत असताना महापालिका प्रशासनाने मात्र शहरात केवळ ३४९ खड्डे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शहरभरातील रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत. मुख्य रस्ते सुस्थितीत असले, तरी अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांकडून सातत्याने या संदर्भात तक्रारी करण्यात येत आहे. मनसेने खड्डेमुक्त शहराच्या मागणीसाठी आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनही केले.

त्यानंतर, महापौरांनी खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू केली. या कार्यवाहीचा अहवाल त्यांनी नुकताच त्यांनी सादर केला. त्यानुसार, शहरात एकूण २३७९ खड्डे होते. त्यातील २०३० खड्डे भरण्यात आले आहेत.

आता केवळ ३४९ खड्डे भरण्याचे काम बाकी राहिले आहे. एकूणातील ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पालिकेच्या या दाव्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही फसवी आकडेवारी असल्याची टीका अनेक नगरसेवकांनी केली आहे. या संदर्भात, शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

शहरात लाखोंच्या संख्येने खड्डे आढळून येतील, त्यामुळे अधिकाऱ्यांचा हा दावा खोटा आहे. चिखली परिसरातील काही रस्त्यांवरच साडेतीनशे खड्डे असतील.   – दत्ता साने, विरोधी पक्षनेता

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad road condition in pune