िपपरीतील भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना ’ भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (६ जून) सायंकाळी िपपरीगाव येथे लांडगे यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्ताने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानही भरवण्यात आले असून, त्यासाठी चांदीची गदा व १० लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थेचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाळासाहेब वाघेरे, खंडू वाळुंज, संदीप कापसे, संतोष वाघेरे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर दुपारी तीन वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. या वेळी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मल्लांचा सत्कार करण्यात येणार आहे. कुस्त्यांसाठी चांदीची गदा व दहा लाख रुपयांचे रोख स्वरूपातील बक्षीसही ठेवण्यात आले आहे. सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मैदानातच लांडगे यांना गौरवण्यात येणार आहे. या वेळी खासदार मुन्ना महाडिक, श्रीरंग बारणे, माजी खासदार नाना नवले, अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आदी उपस्थित राहणार आहेत.