शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात अवजड वाहनांना अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांना दिला आहे. प्रस्तावात केलेल्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे: कोंडी फुटेना; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतरही वाहतुकीची परिस्थिती ‘जैसे थे’

Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे शहरातील वाहतूक कोंंडीतही भर पडली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक विभागाचे उप आयुक्तांना तसा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबतचे पत्र महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आले आहे. अवजड वाहनांमुळेच वाहतूक कोंडी होत आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून या पत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. तसेच बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Story img Loader