पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशी पती-पत्नीला पिंपरी-चिंचवडमधून अटक केली आहे. दोघेही गेल्या आठ दिवसांपासून आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलमध्ये कामगार बनून काम करत होते. टिंकू चौधरी आणि खादिजा खातून अशी दोघांची नाव आहेत. दोघांकडे बनवट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आढळले आहे. दोघांना चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. याच औद्योगिक नगरीत गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याचं वारंवार उघड झालेल आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द असलेल्या आळंदी फाटा येथे हॉटेलमध्ये कामगार बनून बांगलादेशी टिंकू चौधरी आणि खादिजा खातून वास्तव्य करत होते. ते गेल्या आठ दिवसांपूर्वीच त्या हॉटेलमध्ये आले होते. त्याआधी ते हैदराबादमध्ये एक ते दोन वर्षांपासून राहत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दोघांकडे वोटर आयडी आणि आधार कार्ड आढळल आहे. पोलिसांच्या तपासात ते बनावट असल्याचे उघड झाल आहे.

हेही वाचा – पुणे स्टेशनजवळ उपाहारगृहातील कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांकडून दोघांना अटक

हेही वाचा – भाजपचा शहरातील नवा कारभारी कोण? महापालिका निवडणुकीची धुरा मोहोळांकडे की पाटलांकडे, याची चर्चा

आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलवर दोन बांगलादेशी पती-पत्नी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी खात्री करून दोघांकडे चौकशी केली. चौकशीमध्ये ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५), सह परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४ (A)(B), १४ (C) पार पत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१)(सी) व पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३(अ) या कलमानव्ये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh husband and wife arrested from pimpri chinchwad action by atb kjp 91 ssb