सहकार कायद्याविषयीच्या ९७ व्या घटनादुरूस्तीत नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळावरील सेवक प्रतिनिधींची तरतूद रद्द केल्याच्या कारणास्तव नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील काही कामगार संघटनांनी ९ एप्रिल रोजी सर्व सहकारी बँकांची कार्यालये बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र खातेदारांची गैरसोय होऊ नये यासाठी बँक कर्मचारी संघाने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व नागरी सहकारी बँकांतील कामकाज ९ एप्रिल रोजीही सुरू राहणार आहे. संघाच्या कार्यकारिणीने शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
९७ व्या घटनादुरूस्तीतील तरतुदीविषयी न्यायालयीन पातळीवर दाद मागण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यामुळे ९ एप्रिल रोजी बँकांच्या सेवेत कार्यरत राहण्याचे आवाहन संघातर्फे नागरी सहकारी बँकांतील कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.