पुणे : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे राजभाषा वापरासाठी देण्यात येणारा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार देशाच्या बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्रला प्रदान करण्यात आला. सुरत येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन आणि सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या दोन विभागांमधील योगदानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा : स्मार्ट सिटीमधील खड्ड्यांविरुद्ध मनसेने केले असे काही कि…
कार्यक्रमाला सुरवात होण्यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मनुष्यबळ व्यवस्थापन आणि राजभाषा विभागाचे सरव्यवस्थापक के. राजेश कुमार आणि राजभाषा विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र श्रीवास्तव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शासकीय कार्यालये, उपक्रम आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे देशभरातील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन आणि सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये बँकेला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे.