पुणे : बिबवेवाडीतील इंदिरानगर परिसरात दहशत असलेला बापू नायर टोळीतील गुंड तबरेज सुतारने कारागृहातून १३ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांना पकडले. तबरेज सुतारने कोल्हापूर कारागृहातून १४ मोबाइल क्रमांकाचा वापर करून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘… तर होईल सहा महिने कैद,’ युजीसीने दिला स्पष्ट इशारा

याप्रकरणी तबरेज मेहबूब सुतार (रा. कात्रज), अविनाश नामदेव मोरे (रा. सहकारनगर), सागर किसन धुमाळ (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), कुमार उर्फ पप्पू सायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. मोरे आणि धुमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तबरेज सुतार सध्या नागपूर कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>> पुणे : शनिवारी, रविवारी एक्स्प्रेस-वे वापरताय? ही बातमी वाचाच…

यापूर्वी तबरेजला काेल्हापूर कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने कोल्हापूर कारागृहातून वेगवेगळ्या क्रमांकावरुन व्यावसायिकाशी संपर्क साधून दहा लाखांची खंडणी उकळली होती. त्याने व्यावसायिकाला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास तीन गुंठे जमीन नावावर करून देण्यास सांगितले होते. व्यावसायिकाने नकार दिल्यानंतर त्याच्या घरी गुंड पाठविण्यात आले होते. गेले दोन वर्षे तबरेज व्यावसायिकाला धमकावत होता. अखेर घाबरलेल्या व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. व्यावसायिक पूर्वी तबरेजच्या मोटारीवर चालक म्हणून काम करत होता. २०१७ मध्ये तबरेज एका गुन्ह्यात फरार झाला होता. त्यानंतर तबरेजकडे काम करणाऱ्या चालकाने जमीन खरेदी विक्री व्यवहार सुरू केला. जमीन खरेदी विक्री व्यवहारात त्याचा जम बसला. २०२२ मध्ये खून प्रकरणात तबरेजला अटक करण्यात आली होती. कारागृहात असलेल्या तबरेजला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविण्यास सुरुवात केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, दिलीप गोरे, संग्राम शिनगारे यांनी ही कारवाई केली.