पिंपरी : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गाजलेल्या ‘सांगली पॅटर्न’नंतर आता विधानसभा निवडणुकीत महायुतीत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केलेल्या ‘राष्ट्रवादी’च्याच बापूसाहेब भेगडे यांना मावळ भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मावळ पॅटर्नचे राज्यभरात महायुतीत कसे पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे आमदार सुनील शेळके यांना मावळ भाजपचा तीव्र विरोध आहे. शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये बंडखोरी केल्यापासून शेळके यांना भाजप विरोध वाढला. बालेकिल्ला ताब्यातून गेल्याने भाजपचे प्रदेश नेतेही नाराज होते. परंतु, अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने मावळमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. दीड वर्षे शांत राहिल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांच्या विरोधात छुपा प्रचार सुरू झाला होता. दुसरीकडे, आमदार शेळके यांना स्वपक्षातूनही विरोध वाढण्यास सुरुवात झाली. पक्षाचे तळेगाव दाभाडेचे शहराध्यक्ष व माजी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे विरोधात गेले. भेगडे यांनी उमेदवारीवरही दावा केला. भेगडे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे मावळात बंडखोरी होणार हे निश्चित मानले जात होते. परंतु, ‘मावळ पॅटर्न’ उदयास येईल याचा मात्र कोणालाही अंदाज आला नाही.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Devendra fadnavis terror in Nagpur
Rohit Pawar: “नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत”, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

हेही वाचा >>>प्रशिक्षणाचा समावेश असलेला नवा पदवी अभ्यासक्रम… कुठे, कधीपासून होणार सुरू?

दरम्यान, मावळ भाजप आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करू नये, अशी भूमिका आमदार शेळके यांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. भेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भेगडे यांच्यासह मावळ भाजपकडून बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वाटत नव्हती. परंतु, बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदांचे राजीनामे देऊन त्यांना पाठिंबा दिला. अर्थात त्यांनी अजून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. राजीनामे दिल्यानंतर तत्काळ बैठक घेऊन, या नेत्यांनी बापू भेगडे यांचा प्रचार करण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले. महायुतीत याचे राज्यभरात कसे पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>पुण्यात अकरावीच्या हजारो जागा रिक्त…विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ का?

विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य आहे. मावळच्या जनतेच्या आशीर्वादावर बापू भेगडे यांना निवडून आणणार आहोत. योग्य वेळी योग्य प्रयोग करायचा असतो. त्यामुळे मी या वेळी निवडणूक लढविणार नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. पाच वर्षे आम्ही खूप भोगले. येथे ५० वर्षांनी सर्व पक्ष एकत्र आले आहेत, असे माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून बापू भेगडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. परंतु, भाजप नेत्यांच्या मदतीसाठी त्यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. मावळमध्ये महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून भेगडे यांना पाठिंबा दिला जातो, की दुसरा उमेदवार उभा केला जातो, याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे.