बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच बारामती ते काटेवाडी मार्गावर वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका घेऊन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आज रविवारी सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…कांदा खरेदीचा खेळखंडोबा सुरूच; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या, कागदपत्रे रंगवून गैरव्यवहार

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधत विठूनामाचा गजर केला. पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati ajit pawar and sunetra pawar participate in sant tukaram maharaj palkhi ceremony and procession pune print news ccp 14 psg
Show comments