बारामती : कोणताही साखर कारखाना जवळपास १५० दिवस पूर्ण क्षमतेने चालविला पाहिजे, तरच त्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होतो व सर्वांगाने फायदा सुद्धा होतो, राज्य सरकारने या वर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व साखर कारखाना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे जवळपास पंधरा दिवस आपला साखर कारखाना उशिरा सुरू झालेला आहे, असे असताना देखील आपण आपल्या कारखान्याकडे नोंदविलेले संपूर्ण ऊस साधारण २० ते २५ मार्च २०२५ अखेर पर्यंत संपवणार असून आपल्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे, कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील साखर कारखान्याला ऊस घालू नये, बाहेरील कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती बंद करण्यात येणार आहेत, असे पत्रक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीसाठी दिलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार १६ फेब्रुवारी पर्यंत सोमेश्वर साखर कारखान्याने ९३ दिवसांमध्ये ८,६१,३८९ इतक्या उसाचे गाळप केले आहे, यामधून सरासरी ११. ५१ टक्के साखर उतारा राखत ९,८८, २५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले, सोमेश्वर साखर कारखान्याचे दैनंदिन साखर गाळप क्षमता ७,५०० मॅट्रिक टन प्रतिदिन असताना देखील प्रति दिवस ९,२६२ मॅट्रिक टनाच्या उच्चांकी सरासरीने कारखाना उसाचे गाळप करीत आहे, तसेच साखर कारखानाच्या को – जनरेशन प्रकल्पातून ६,१४,३४,१३५ इतक्या युनिटची वीज निर्मिती केली असून ३,५७, ५९,८९२ एवढ्या युनिटची वीज विक्री केली आहे, त्याचप्रमाणे साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ४२, ६०, ४०३ लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २३, १७, ७२० लिटल इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे, अशी माहिती ही कारखान्याच्या अध्यक्ष श्री. जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुदैवाने इतर कारखान्याच्या तुलनेने समाधानकारक ऊस आहे तसेच बाजूच्या अनेक कारखान्याने गाळप क्षमता वाढविल्यामुळे आणि त्यांचे कार्यक्षेत्र पर्यायाने श्री. सोमेश्वर कारखान्यापेक्षा कमी असल्याने त्यांना उसाची कमतरता भासत आहे, तसेच अनेक कारखाने आता क्षमतेपेक्षा कमी चालत आहेत, तर काही कारखाने बंदही होत आहेत, अशा परिस्थितीत आसपासच्या कारखान्यांची असलेले आपल्या कार्यक्षेत्रांमधील कुठलीही तारीख न पाहता या कारखान्याची लवकर ऊस नेण्याचे प्रलोभन दाखवून अनेक सभासदांना ऊस बाहेरच्या कारखान्यात घालण्यास बळी पाडले जात आहे, तरी अशा तात्पुरत्या प्रलोभनाला बळी न पडता आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये, साखर कारखान्याकडे नोंदविलेला ऊस बाहेर देऊन कारखान्याबरोबर केलेल्या ऊस नोंद कराराचा भंग करून उत्पादित केलेल्या ऊस इतर कारखान्याला देण्याची चूक करू नये, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये वाढता ऊस क्षेत्राचा विचार करून कारखान्याने गाळप क्षमता प्रतिदिन ७,५०० मॅट्रिक टर्न केलेली आहे, सोमेश्वर साखर कारखाना आज जवळपास ९,७०० ते ९,८०० मॅट्रिक टन प्रतिदिन क्षमतेने गाळप करत आहे, सोमेश्वर कारखान्याने पूर्व हंगामी, सुरु व खोडवा या उसांना अनुदान देखील दिलेले असताना बाहेरील ऊस कारखान्यांना ऊस घालून कारखानाच्या संचालक मंडळास नाईलाज असतो बाहेरून घालणाऱ्या सभासदांवर कारवाई करण्याची वेळ आणून देऊ नये, ही विनंती आहे.

कारखाना चे संपूर्ण गाळप वेळेत पूर्ण होत असताना कारखान्याच्या नोंदीच्या संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे, जेणेकरून जेवढे जास्त गाळत तेवढा जास्त उत्पादन खर्च कमी व त्यामुळे आपल्या सभासदांना जास्तीचा मोबदला देणे शक्य होईल, तरी या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे सभासदांना कळकळीचे व नम्रतेची विनंती करण्यात येत आहे की,आपण उत्पादित केलेला आपला ऊस आपल्याच कारखान्याला देऊन सहकार्य करावे,

१)सोमेश्वर कारखान्याने जास्त गाळप केलेले जास्त साखर उत्पादन जास्त वीज निर्मिती व विक्री, आदिच्या अल्कोहोल उत्पादन यामुळे आपणास उच्चंकी दर देण्याचे परंपरा कायम राखता येईल.

२) सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याला नोंदविलेला ऊस बाहेर घालण्यावर सर्व सभासदाच्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसेच ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ऊस तोडणी कामगारांच्या बिलातून ते पैसे वसूल केले जातील, त्यामुळे ऊस तोडी साठी कुणीही पैसे देऊ नयेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची सहमती नसताना जळीत केल्यास शेतकऱ्यांकडे लेखी तक्रार करावी, बिगर सहमतीशिवाय कारखान्याचा ऊस जळीत केल्यास व तसे आढळल्यास ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचा ऊस वाहतूक बिलातून सदरील जळीची रक्कम वसूल करून संबंधितास अदा केली जाईल, अशी माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामधून दिली आहे.