पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून सकाळी कमी प्रमाणात मतदान झाले असताना दुपारी १.३० वाजेपर्यंत २७.५५ टक्के मतदान झाले आहे. विशेषतः भोर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ३३.४१ टक्के, तर त्यापाठोपाठ बारामती विधानसभा मतदासंघात ३२.११ टक्के मतदान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाच्या झळांमुळे मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र मतदारांचा उन्हाची तीव्रता असताना प्रतिसाद पहावयास मिळाला आहे. निवडणूक विभागाकडून करण्यात मतदान केंद्रांवर सावलीसाठी टाकण्यात आलेले मंडप, वैद्यकीय सुविधा आणि ओआरएस कीट आणि सुविधा देण्यात आल्याने मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.सकाळी ११ वाजेपर्यंत १४.६४ टक्के मतदान झाले असताना दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे दीड तासात २७.५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे.

आणखी वाचा-मतदानासाठी लंडनहून थेट बारामतीला

सहा विधानसभा मतदार संघ निहाय मतदान

मतदारसंघ११ पर्यंतदीड पर्यंत
दौंड१२२६
इंदापूर १४.१८ २५.१
बारामती १८.६३ ३२.११
पुरंदर१४.८२४.५
भोर १३.८३३.४१
खडकवासला १४ ५.१
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati constituency voters response to polling even in hot sun pune print news psg 17 mrj