बारामती : – बारामतीच्या इतिहासामध्ये प्रथमच दोन हजार चारशे वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ नाण्यांचे व नोटांचे भव्य प्रदर्शन आठ ते अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान नटराज नाट्य कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलीची माहिती एस के हॉबी वर्ल्ड चे संयोजक राकेश शहाणे यांनी दैनिक लोकसत्ता प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या प्रदर्शनात हिंदवी साम्राज्याचे पहिले नाणे, शिवकालीन नाणी, संस्थानाचे सोने व चांदीची नाणी, दुर्मिळ पुरातन नाणी संग्रह, ब्रिटिश कालीन नाणी व नोटा, संस्थानांचे दुर्मिळ स्टॅम्प पेपर, पोस्टाची तिकीट आहे, सुमारे दोनशे देशातील नाणी व नोटा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहेत,
हे प्रदर्शन पाहण्यासाठी पाच वर्षाखालील मुलांना मुक्त प्रवेश असून मोठ्या व्यक्तींना पाहण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क आहे, यावेळी या प्रदर्शनात तुमच्या वाढदिवसाची तारीख असलेली नोट एक रुपये ते पाचशे रुपये पर्यंत नोटा पाहण्यास मिळतील, अशी प्रदर्शनाच्या संयोजक माहिती राकेश शहाणे यांनी दिली.