महावितरणच्या वतीने पुणे प्रादेशिक विभागामध्ये वीजचोरी विरोधात राबविण्यात आलेल्या एक दिवसाच्या मोहिमेमध्ये पुणे, बारामती आणि कोल्हापूर परिमंडळात वीजचोरीची दीड हजार प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यात सर्वाधिक वीजचोऱ्या बारामती परिमंडळात सापडल्या आहेत.महावितरणचे प्रदेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोऱ्यांविरुद्धची एकदिवसीय मोहीम राबविण्यात आली. पुणे, बारामती आणि कोल्हापूर परिमंडळामध्ये एकाच वेळी विविध पथकांनी संशयास्पद ठिकाणी जाऊन वीजजोडांची पाहणी केली. तीनही परिमंडळाच या मोहिमेमध्ये वीजचोरीची १५०१ प्रकरणे उघडकीस आली. बारामती परिमंडळात त्यातील सर्वाधिक ८९३ प्रकरणे आहेत. पुणे परिमंडळात १७४, तर कोल्हापूर परिमंडळात ४३४ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

हेही वाचा >>> अकरावी प्रवेशासाठी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत दैनंदिन गुणवत्ता फेरी

मोहिमेमध्ये एकूण ११ हजारांहून अधित वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आवी. त्यात प्रत्यक्षात वीजचोरी आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या मोहिमेत अनधिकृतपणे वीजवापराचीही प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा ३४८ प्रकरणांमध्ये विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १२६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Story img Loader