पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौर्यावर येत असून बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे. या दौर्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी अनेक राजकीय प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली. तर यावेळी राम शिंदे म्हणाले की,कोणाचा तरी बालेकिल्ला वाटत असेल पण आम्ही जो देशात बालेकिल्ला (अमेठी) होता.तो आम्ही खेचून आणला. त्यामुळे हा बालेकिल्ला नाही.आम्ही अमेठी जिंकू शकतो,तर बारामती का नाही अशी भूमिका भाजपचे नेते आमदार राम शिंदे मांडत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर पंरतु कोणी जर असा दावा करीत असेल की, इथे आमचाच बालेकिल्ला आहे आणि आम्हीच जिंकू,तर तो दावा स्पेशल फेल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात.
यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात. यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करीत असून सर्व सामान्य जनतेला जाऊन विचारले.तर समजेल की,झालेला विकास पाहण्यास येत आहोत की, भकास झालेला पाहण्यास येत आहे. हे येणाऱ्या काळात निश्चित त्यांना कळेल,असा टोला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना त्यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की,मागील अडीच वर्षात स्वतः च्या मतदार संघात फिरल्या नाहीत. पण आता निर्मला सीतारामन येणार असे समजताच घरोघरी जाऊन फिरत आहे. त्यामुळे येण्या अगोदर त्या घाबरल्या आहेत हे स्पष्ट होतं असल्याचे सांगात सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केली.
हेही वाचा : पिंपरी : विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करा; उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आता लक्ष बारामती
गुरू शिष्याच्या परवानगीने हा दौरा होत आहे का ? त्यावर राम शिंदे म्हणाले की,मी तर काय कोणाचा गुरू नाही आणि शिष्य देखील नाही.तुम्हाला त्यांच्या शिवाय हा दौरा होत आहे.असे वाटत का ? हा दौरा केंद्रीय नेतृत्वाने आणि भारतीय जनता पार्टीने तयार केलेला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम गुरूंच्यासमोर तयार झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.(आपल काही तरी चुकले आहे.हे लक्षात येताच) मी आमचे गुरू म्हटलं,त्यामुळे स्वतःला गुरू म्हणून घ्यायच ठरवल,तर अवघड आहे. आता कुठलाही रेफरन्स कुठे जोडू नका.आता लक्ष बारामती आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर कार्यक्रम ठरलेला आहे. आता आम्ही कार्यक्रम करणार असल्याच त्यांनी सांगितले.
माझा अभ्यास झाला की निश्चित सांगतो :राम शिंदे
राज्यातील एखाद विकासाच मॉडेल असलेला मतदार संघ भाजपकडे आहे.त्यावर शिंदे म्हणाले की, मी बारामती मतदार संघाचा प्रभारी असून माझ्याकडे एकच मतदार संघ आहे.त्यामुळे माझा अभ्यास झाला की, निश्चित सांगतो.असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : हडपसरमध्ये मध्यरात्री कालव्यात मोटार कोसळली, पाणी कमी असल्याने…
निर्मला सीतारामन यांच्या भाषेबाबत बोलत असला तर मी आहे ना
भाजपच्या नेत्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौर्यावर येणार आहेत.पण त्यांची भाषा नागरिकांना समजेल का त्या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की,निर्मला सीतारामन या बारामती दौर्यावर येत आहे. त्यांच्या भाषेबाबत बोलत असला तर मी आहे ना,माझी तर अस्सल मराठी भाषा आहे.ती समजेल ना,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.