पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाचे पार्थ, वहिनी ‘बारामती’तील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, तर सुनेत्रा पवार यांनी सुळेंसह पती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सासू आशाताई पवार यांनाही कर्ज दिले असल्याचे उघड झाले आहे.

विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात एक कोटी आठ लाख ९७ हजार ३४८ रुपयांनी भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ५.६८ कोटी रुपये असून, सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून सन २०१९ मध्ये उसने घेतलेले ५५ लाख रुपये पाच वर्षांनंतरही फेडलेले नाहीत. पार्थ यांच्याकडून २० लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

हेही वाचा >>> मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे कुटुंबाच्या नावावर १३३.३६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे कुटुंबाच्या नावावर १६५ कोटी ४२ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ता होती, तर सध्या सुळे कुटुंबाकडे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर अन्य कोणत्याही संस्थेचे कर्ज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुळे यांनी सुमारे तीन कोटी ५८ लाख ७७ हजार २३० रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी सुमारे सहा कोटी ५५ लाख १६ हजार ६७३ रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. सुळे यांच्याकडे दोन कोटी ६१ लाखांच्या सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तू आहेत.

कुटुंबीयांना कर्जपुरवठा

सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना ८२ लाख ८१ हजार ८७८ रुपये, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार ३०३ रुपये, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख रुपये, तर सुप्रिया सुळे यांना ३५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

सुनेत्रा पवार अब्जाधीश

● एकूण संपत्ती : १,२७,५९,९८,२०५ रु.

● जंगम मालमत्ता : १२,५६,५८,९८३ रु.

● पती अजित पवार : १३,२५,०६,०३३ रु.

● इतर कुटुंब : ३,८३,६४,७९७

● वारसा हक्काने : ३३,०९,९९,६४९

● पतीकडे : ७५,०४,१८०

● कर्ज : १२,११,१२,३७४

● पतीकडे : ४,७४,३१,२३९

● रोख रक्कम : ३,९६,४५०

● पतीकडे : ३,१२,१३०

● वाहने : ट्रॅक्टर, ट्रेलर, तर अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, टोयोटा, होंडा सीआरव्ही या चारचाकी.

● शेतजमीन : बारामतीमधील सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोडांबेवाडी येथे शेतजमीन.

● सदनिका : पुण्यात कल्याणीनगर येथे झिरोजी अपार्टमेंट, पुण्यातील सिंध सोसायटी, बिबवेवाडीतील सोबा सवेरा आणि वरळीतील शुभदा अपार्टमेंट.

● शिक्षण : छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी.

धंगेकरांच्या मालमत्तेत घट

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मालमत्त्तेत आमदार झाल्यावर घट झाली आहे. सध्या सात कोटी दहा लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता असलेल्या धंगेकरांची वर्षभरात सुमारे सव्वा कोटीने मालमत्ता कमी झाली आहे.

कोल्हेंची संपत्ती पाच वर्षांत दुप्पट

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढली आहे. त्यांची आणि कुटुंबीयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे आठ कोटी ४२ लाख रुपये आहे. २०१९ मध्ये त्यांची मालमत्ता सुमारे साडेचार कोटी रुपयांची होती.

उदयनराजे यांच्या संपत्तीत २१ कोटींची घट

वाई : साताऱ्यातून भाजपचे उमेदवार असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे. उदयनराजे यांनी आज अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये १७२ कोटी ९४ लाखांची मालमत्ता दाखवली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची मालमत्ता १९३ कोटी रुपयांची असल्याचे नोंदवण्यात आले होते.

● एकूण संपत्ती : ७,१०,६५,१४३ रु. ( गेल्या वर्षी ८,३६,१०,४५६)

● रोख रक्कम : ७६,४०० रु.

● पत्नीकडे : ६२,१०० रु.

● जंगम मालमत्ता : २३,२६,०८३ रु. (गेल्या वर्षी ४७,०६,१२८)

● स्थावर मालमत्ता : ४,५९,६३,९५८ रु.

● सदनिका : रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका.

● वाहने/दागिने : दोन दुचाकी, दहा तोळे सोने, पत्नीकडे १५ तोळे.

● कर्ज : ७१,१५,४३५ रु.

● खटले : धंगेकर यांच्यावर आठ प्रलंबित खटले आहेत.

● एकूण संपत्ती : ८,४२,००,००० रु. (२०१९ मध्ये ४,५०,००,०००)

● रोख रक्कम : ४०,००० रु.

● पत्नीकडे : २५,००० रु.

● जंगम : ८२,३९,५०५ रु.

● स्थावर : ३,६०,२५,२३६

● पत्नीकडे : ३,५१,१३५००

● कर्ज : २,९९,६५,५४२

● वाहने : पजेरो ही चारचाकी, तर बुलेट ही दुचाकी.

● शेतजमीन : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (कोल्हेमळा) येथे शेतजमीन.

● सदनिका : पुणे जिल्ह्यात नारायणगाव, मुंबईतील परळ आणि भोईवाडा, नाशिकमध्ये देवळाली येथे सदनिका.