बारामती शहरातील सन २०२४ -२०२५ या वित्‍तीय वर्षामध्‍ये बारामती नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्‍ता धारक यांना अधिपत्र बजावून वारंवार घरभेटी देवूनही मालमत्‍ता धारक यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे वसुलीचा भरणा केलेला नाही. वसुली पथके व जप्‍ती पथकाव्‍दारे थकित मालमत्‍ता धारकावर धडक कारवाई करून मालमत्‍ता सील, जप्‍ती करणे, जप्‍त केलेला माल अटकाव करणे इत्‍यादी नियमोचित करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. अशी महिती बारामती नगर परिषदेचे मुखाधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

​सन २०२४ – २०२५ या वित्‍तीय वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी बिले भरलेली नसेल तर खालील प्रमाणे भरणा करू शकता. बारामतीकर आता भरा, ऑनलाईन मिळकत कर.

१ ) ऑनलाईन वेबसाईटव्‍दारे WWW.baramartimc.org

२) मोबाईल अ‍ॅप व्‍दारे BRM TAX अ‍ॅप

३ ) CARD PAYMENT CREDIT, DEBIT व्‍दारे

४ ) RTGS, NEFT, IMPS, SI WALLET व्‍दारे

५ ) QR CODE व्‍दारे

६ ) नागरीसुविधा केंद्राव्‍दारे

बारामती शहरातील वाढीव व मुळ हद्दीतील मिळकत धारकांना नम्र आवाहान करणेत येते की आपली घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरा आणि बारामती नगर पालिकेला सहकार्य करा व कटुता टाळा. अशी महिती बारामती नगर पालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी कळविली आहे.

Story img Loader