बारामती : बारामतीत म्हाडाच्या प्लॉटधारकांच्या जागेवर आयुर्वेदिक महाविद्यालय उभारून म्हाडाच्या प्लॉटधारकांना पाच किलोमीटरच्या हद्दीत पर्यायी जागा न दिल्याने म्हाडा प्लॉटधारकांनी काल बुधवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
यातील उपोषणकर्ते आनंद धोंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रात्रीत सात बारा उतारावरची नावे गायब झाली, शासकीय अधिकाऱ्यांनी प्लॉटधारकांना विचारात न घेता त्या जागेवर आयुर्वेदिक महाविद्यालय उभारले आहे. आम्हाला बारामती शहरापासून पाच किलोमीटरच्या आत पर्यायी जागा मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे, मात्र प्रत्यक्षात बारामतीपासून गोजूबावी गावानजीक माळरानावरची पर्यायी जागा म्हणून आम्हाला देऊ केली आहे.
बारामती शहरातील मेडद हद्दीतील म्हाडाच्या प्लॉटधारकांची जागा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला घेऊन आता त्या जागेऐवजी गोजूबावी येथील माळरानावरील जमीन पर्यायी म्हणून दिली जात आहे, हे आम्हाला मान्य नाही, म्हाडा प्लॉटधारकावरील हा अन्याय असून आम्ही याबाबत न्यायालयीन लढाई लढणार आहोत, अशी माहितीसुद्धा आंदोलनकरते आनंद धोंगडे यांनी दिली.