बारामती : रविवार (दि.०२/०३/२०२५ )रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीसांना गोपनीय बातमीदार यांच्या कडुन मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल,असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला आहे. या माहितीच्या अनुशंगाने लागलीच संबंधित व्यक्ती वर पोलीसांनी त्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपणीय माहितीचे अनुसार औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्यक्तीच्या अश्या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्या व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे प्रस्ताव तयार करून तो अप्पर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गणेश बिरादार यांना सादर केला असता यावर सुनावणी घेऊन त्या व्यक्तीच्या कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाल्याने, प्रतिबंधक उपाय योजना म्हणून त्याने योग्य व लायक जामिनदार न दिल्याचे त्याची १४ दिवसांकरीता रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील वेगवेगळ्या समाज मध्यमात नागरिक ठेवत असलेल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्या माध्यमातून कोणत्याही धर्मा विरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास चालु असून आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे उत्सव येणार असून या उत्सवांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश कोणत्याही धर्माच्या इसमाने कोणत्याही धर्मा विरुद्ध समाज माध्यमावर पोस्ट करू नये असे आवाहन सर्वं नागरीकांना करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिणचे पंकज देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार,बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

विशाल शामराव पवार ( वय ३६, रा. लासुर्णे , तालुका इंदापूर जिल्हा पुणे) व प्रज्वल प्रताप मोडपणे पाटील( वय २२ रा. पिटकेश्वर,तालुका इंदापूर जिल्हा पुणे )हे दोन्ही व्यक्ती पोलीस रजिस्टर नुसार गुन्हेगार असून ते शेटफळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावी भिगवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयितरित्या फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याने संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश बिरादार यांनी काल ता.३/३/२०२५ रोजी दोघांची पुणे येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे, अशी महिती पोलिसांनी दिली आहे.