पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. देशात लाखो लोकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या आवाहनानंतर विद्यार्थी, नेते आणि विविध क्षेत्रातील लोकांनी रविवारी, १ ऑक्टोबर एक तास श्रमदान केलं. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.

यावेळी एका महिलेनं कचऱ्यासंदर्भात अजित पवारांकडे गाऱ्हाणं मांडलं. अजित पवार यांनीही महिलेची अडचण तातडीनं सोडवण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

नेमकं काय घडलं?

अजित पवार म्हणाले, “बारामती शहरात ठिकठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्याचं काम केलं. बारामतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आपण आपला कचरा, घाण योग्य कचरा कुंडीत टाकली, तर स्वच्छतेचा प्रश्न येणार नाही.”

हेही वाचा : “आदू बाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलं”, भाजपाच्या ‘त्या’ टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

यावेळी अजित पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यानंतर अनंतनगर येथील एक महिला ओरडत म्हणाली, ‘दादा इथं कचऱ्याची गाडी येत नाही. आली तर थांबत सुद्धा नाही. घंटा गाडी सुरू करा, घाण होणार नाही.’

हेही वाचा : “वाघनखे शिवाजी महाराजांची की शिवकालीन?” आदित्य ठाकरेंच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

यावर “कचऱ्याची गाडी येत नाही म्हणूनच दादा आलाय. तुमची सूचना योग्य आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, कचऱ्याची गाडी किती वाजता येते पाहा? रोजचे रोज गाडी पाठवा, असे निर्देश अजित पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

Story img Loader