पुणे : पीएच. डी. अधिछात्रवृत्तीसाठी १० जानेवारीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) जाहीर केला होता. मात्र हा निर्णय बार्टीने फिरवला आहे. नव्या निर्णयानुसार आता सीईटी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत २०१९च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यावर आक्षेप घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत आधीची परीक्षा रद्द करून १० जानेवारीला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी १० जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. त्यानंतर बार्टीने परीक्षा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर सारथीने परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले.

हेही वाचा… पिंपरी: महापालिका आयुक्तांना ‘झिरो पेण्डन्सी’चा विसर; स्वाक्षरीसाठी दालनात फायलींचा ढिगारा

हेही वाचा… महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाची हजेरी

या पार्श्वभूमीवर, बार्टी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय यांच्याशी समान धोरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेतली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी १० जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. परीक्षा ठरलेल्या तारखेनुसार १० जानेवारीला घेण्यात येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barti declared that cet examination for phd postgraduate scholarship will be at 10th january pune print news ccp 14 asj
Show comments