पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाला होता. त्यामुळे आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत २०१९मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे समोर आले. मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी बैठक झाली.

हेही वाचा – पुणे महापालिका आक्रमक भूमिकेत, पाणीपट्टी थकवणाऱ्यांचे आता पाणी बंद

हेही वाचा – राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक

या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे जानेवारीमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Story img Loader