घरात डोकावून पाहिल्याचा जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आकाश सतीश जगताप (वय २०), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २२, दोघे रा. रामनगर, वारजे) यांना अटक करण्यात आली. किरण धरडे (वय ४२, रा. रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. धरडे यांनी याबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जगताप आणि शिंदे हे धरडे यांच्या घरात डोकावून पाहत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे : ऑनलाइन पीएच.डी.ला मान्यता नाही ; युजीसीकडून स्पष्ट इशारा

त्यामुळे धरडे यांनी आरोपींना जाब विचारला. जगताप आणि शिंदे यांनी धरडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. धरडे यांच्या घरावर दगफेक करुन आरोपी पसार झाले. याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे तपास करत आहेत.