पुणे : घरगुती वादातून सख्ख्या भावानेच साथीदारांच्या मदतीने भावाला हॉकी स्टीकने मारहाण करीत त्याच्या ज्यूस सेंटरची तोडफोड करुन नुकसान केले. सारसबाग परिसरातील अंबरज्यूस वर्ल्ड सेंटर येथे १० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणिक मेसा माने, विशाल शिंदे, यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बाबा माने (वय ४६, रा. धनकवडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा आणि माणिक सख्खे भाऊ असून त्यांच्यात कौटुंबीक वाद आहेत. त्याच रागातून माणिकने सात ते आठ साथीदारांना बोलावून घेत भावाला हॉकी स्टीकने मारहाण केली. त्यानंतर सारसबाग चौपाटी परिसरात असलेल्या ज्यूस सेंटरची तोडफोड करुन नुकसान केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.