जी-२० देशांच्या बैठकीसाठी शहरातील प्रमुख साठ चौकांचे सुशोभीकरण महापालिकेकडून केले जाणार आहे. खासगी बांधकाम व्यावासायिक आणि संस्थांची त्यासाठी मदत घेतली जाणार असून, डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातही बैठक घेण्यात आली.

हेही वाचा >>>उपाहारगृह भाडेतत्वावर देण्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक

Due to increasing urbanization 36th police station in nagpur is located in Garoba Maidan area
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
new building construction hearing thane Municipal Corporation tree cutting Raymond company
रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
pune After protests in Chikhli Kudalwadi municipal administration gave six days to remove unauthorized constructions
पिंपरी : अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी व्यावसायिकांना सहा दिवसांची मुदत, महापालिका, पोलीस प्रशासन आणि व्यावसायिकांंच्या बैठकीत निर्णय
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय

जी-२० राष्ट्रसमूहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात परिषद होणार आहे. जी-२० परिषदेचे सदस्य शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. परिषदेसाठी २० देशांचे २०० हून अधिक प्रतिनिधी पुण्यात उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर सुशोभीकरणावर भर दिला आहे.

हेही वाचा >>>महिलेवर बलात्कार प्रकरणी महावितरणमधील लिपिक अटकेत

चौकांचे सुशोभीकरण करताना खासगी बांधकाम व्यावसायिक आणि संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित व्यावसायिकाची राहणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील ६० चौकांचे खासगी संस्था, बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही व्यावसायिक दोन, तीन किंवा पाच चौकांचेही सुशोभीकरण करणार आहेत. सुशोभीकरणाबरोबरच त्याच्या पुढील चार- पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीही संबंधित व्यावसायिक करतील. यामध्ये १८ बाय २४ इंच आकारात त्यांना स्वतःचे नाव वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे: ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात’ महाराष्ट्राची आघाडी ; केरळ, पंजाबसह महाराष्ट्र संयुक्तरीत्या प्रथम

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावरही बैठकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेशकुमार सिन्हा, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव सोमकुवर, वैज्ञानिक अतिफ खान, आर.आर. तिवारी, व्यवस्थापक अनुज कौशल उपस्थित होते.

हेही वाचा >>>“तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”

परिषदेच्यानिमित्ताने देशाचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सौरभ राव यांनी सांगितले. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भारत, महाराष्ट्र तसेच पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचनाही महापालिकेला करण्यात आली आहे.

Story img Loader