पती आणि सासरच्या व्यक्तींना कंटाळून किंवा सासूच्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली अशा अनेक घटना आपण वाचल्या असतील. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पत्नी तृप्तीला दारू आणि शॉपिंगचे व्यसन होते. त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. मयत पती जयकडे पैशांसाठी ती नेहमी तगादा लावत असे. पैसे दिले नाही तर तृप्ती जयला मारहाण करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तृप्तीला चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे.

जय देविदास तेलवानी (वय -३५) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर तृप्ती जय तेलवानी असं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पत्नीचे नाव आहे. तृप्तीला दारू आणि शॉपिंग चे व्यसन होते त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. आरोपी तृप्तीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जयची आई कांचन देविदास तेलवानी यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.

Young murder by father Dadar, murder Dadar,
दादरमध्ये वृद्ध पित्याकडून तरुणाची हत्या
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office
हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या फोनकॉलनंतर खळबळ; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली
Mumbai crime news, Youth Murder Ghatkopar,
मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या
man arrested for wifes murder in Virar
विरारमध्ये पत्नीची हत्या, पतीला अटक
School girl molested by senior citizen by threatening to kill her
pune crime: शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठाकडून अत्याचार
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या

सविस्तर माहिती अशी की,नोव्हेंबर महिन्यात मयत जय देविदास तेलवानी याने पत्नीच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर जयच्या कुटुंबाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा आरोप करत चिखली पोलिसात सुनेविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात सून तृप्ती जय तेलवानी ही दोषी आढळली आहे. पती-पत्नी हे गेल्या काही वर्षांपासून आई वडीलांपासून स्वतंत्र राहतात. जय हा प्लंबरचे काम करायचा तर तृप्ती गृहिणी होती. संसार सुखाचा सुरू असताना पत्नीला दारूचे व्यसन लागले. तसेच ती मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करत होती. पती जयला पैशांसाठी तगादा लावायची, यासाठी तिने एकदा कर्जाचे पैसे काढायला भाग पाडले होते. पैशांची पूर्तता न केल्यास तृप्ती जयला शिवीगाळ करत मारहाण करायची. पुढे चालून तिने स्वतःआत्महत्या करण्याची धमकी जयला दिली होती. जय पूर्णतः मानसिक तणावाखाली आला होता. तृप्तीने जयला कँसर असल्याचा व्हिडीओ  बनवला आणि तो सगळ्या मित्रांना दाखवून मानसिक आणि शारिरीक छळ सुरू ठेवला. याच तणावातून जयने नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या करत जीवन संपविले.