लोणावळा : लोणावळ्यातील आई एकविरा गडावर मधमाशांनी अचानक भाविकांवर हल्ला करत चावा घेतला. ही घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी घडली. आई एकवीरा गडावर भाविकांच्या पालखीसोबत असणाऱ्या धुपबत्तीमुळे ज्यात रसायनिक घटकांचा समावेश असू शकतो यामुळे मधमाशांनी हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर भाविकांना खाली बसावं लागलं. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक जण आई एकविरा च्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती. दरम्यान, मुंबईच्या कुलाबा येथून काहीजण देवीची पालखी घेऊन आले होते. पालखीतील धूपबत्ती लावल्याने त्यातून निघालेल्या धुरामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा-घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर भाविकांमध्ये धावपळ झाली. अनेक जण खाली बसले होते. काही जण मोबाईलमध्ये घटनेच चित्रीकरण होते. घटनेनंतर अर्धा तासाच्या आत दर्शन रांग पूर्ववत झाली होती. अशी माहिती आई एकविरा गडाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काही जणांना या घटनेत मधमाशांनी चावा घेतला आहे. सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.