पुणे : लष्कर भागात भिक्षेकऱ्याला मारहाण करुन करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खून झालेल्या भिक्षेकऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खून झालेल्या भिक्षेकऱ्याचे वय अंदाजे ६० वर्ष आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील नेहरु मेमाेरिअल हाॅलसमोरील पदपथावर रात्री भिक्षेकरी झोपतात. खून झालेला ६० वर्षीय भिक्षेकरी तेथे झोपायचा. तेथे आणखी एक भिक्षेकरी झोपायचा. गुरुवारी पहाटे दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर भिक्षेकऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत भिक्षेकरी गंभीर जखमी झाला. सकाळी पदपथावर भिक्षेकरी मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. भिक्षेकऱ्याचा खून करुन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

Story img Loader