लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : दिवाळी तीन दिवसांवर आली असताना शहरातील ८१ हजार १५७ लाभार्थ्यांना अद्याप आनंदाचा शिधा मिळालेला नाही. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना मंगळवारअखेर फक्त साखर, मैदा आणि तेल अशा तीनच गोष्टी वितरित झाल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शहरातील निगडी आणि भोसरी या दोन परिमंडळांतर्गत २४८ स्वस्त धान्य दुकाने आहेत. निगडी परिमंडळामध्ये ३७ हजार ७३१, तर भोसरी परिमंडळामध्ये ४३ हजार ४२६ असे ८१ हजार १५७ लाभार्थी आहेत. दिवाळीनिमित्त शासनाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही आनंदाचा शिधा शंभर रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा चारच वस्तू होत्या. यामध्ये दोन वस्तूंची भर पडली. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला.
आणखी वाचा-असेही जीवदान! सुरतमधील व्यक्तीची फुफ्फुसे सव्वा दोन तासांत पुण्यात आणून यशस्वी प्रत्यारोपण
साखर, मैदा आणि तेल अशा तीन वस्तू स्वस्त धान्य दुकानदारांकडे आल्या आहेत. उर्वरित वस्तू आज येतील. सर्व वस्तू आल्यानंतर लाभार्थ्यांना तत्काळ वितरण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत. -सचिन काळे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी
भोसरी परिमंडळांतर्गत आनंदाचा शिधामधील सर्व वस्तू काही रेशन दुकानदारांकडे आल्या असून, त्यांचे वाटप सुरू झाले. ज्या दुकानदारांकडे साहित्य आले नाही. त्यांना दोन दिवसांत सर्व साहित्य पोहोच केले जाईल. -गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, भोसरी
आनंदाच्या शिधाच्या संचातील काही वस्तू स्वस्त धान्य दुकानदारांकडे आल्या नाहीत. शासनाने उर्वरित वस्तूंचे रेशन दुकानदारांना तत्काळ वितरण करून नागरिकांना दिवाळीपूर्वी सर्व वस्तू कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत. -विशाल काळभोर, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस</strong>