लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. सॅलिसबरी पार्क परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वसीम बाबासाहेब बागवान (वय ३६, रा. सनराईज अपार्टमेंट, हांडेवाडी रस्ता, हडपसर), तेजस कन्हैयालाल रुपारेल (वय ४२, रा. पौर्णिमा अपार्टमेंट, सॅलिसबरी पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सॅॅलिसबरी पार्क परिसरातील पौर्णिमा अपार्टमेंटमधील एका सदनिकेत बागवान आणि रुपारेल आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
आणखी वाचा-पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
बागवान आणि रुपारेल सट्टा घेत असल्याचे घेत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आणि पथकाने ही कारवाई केली. कोथरुड परिसरात गुन्हे शाखेने छापा टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पकडले होते.